आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय गुंडांना जशास तसे उत्तर द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कायद्याचा धाक नसल्याने राजकीय गुंड अधिकारी, कर्मचार्‍यांवर हल्ले करत आहेत, काळे फासत आहेत. कर्मचारी व अधिकार्‍यांनी एकत्रित येऊन अशा प्रवृत्तीला विरोध करण्याबरोबरच जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी बुधवारी केले.

सहकार खात्यातील गट क कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने बाजार समितीतील शेतकरी भवन सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राजपत्रित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शरद जरे, उपाध्यक्ष नितीन काळे, सहकार विभाग राजपत्रित कर्मचारी संघटनेचे महासचिव आनंद कटके, कोषाध्यक्ष कैलास जेबले, सहसचिव किरण सोनवणे, सतीश खरे, डी. एम. पालोदकर, उपाध्यक्ष राजेंद्र जोशी, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, गट क कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी. एम. सवंडकर, कार्याध्यक्ष भगवान अवघडे, सरचिटणीस बी. बी. सिनारे, न्जी. एस. जगताप आदी यावेळी उपस्थित होते. कर्मचारी व अधिकार्‍यांवरील भ्याड हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून समन्वय साधत ठोस उत्तर देण्याची आवश्यकता खोंडे यांनी व्यक्त केली. या संदर्भात 4 सप्टेंबर रोजी पुण्यात अधिकारी व कर्मचार्‍यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे.