आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू व्यावसायिकांच्या जाचामुळे युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाळू व्यावसायिकांपासून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून बावीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

धनंजय दिलीप राजेभोसले (22) असे या युवकाचे नाव आहे. राजेभोसले यांच्या शेजारीच या वाळू व्यावसायिकांची शेती आहे. राजेभोसले यांनी त्यांची शेती आपल्याला विकावी, म्हणून शेजारच्या वाळू व्यावसायिकांनी दबाव आणला होता. याबाबत अनेक तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे झालेल्या त्रासाला कंटाळून धनंजयने विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.