आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये विंगर व्हॅन उलटून युवकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बेलापूरला लग्न समारंभाकरिता निघालेली विंगर व्हॅन दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. शाहरुख इस्माईल पठाण (22, मुकुंदनगर, नगर) असे त्याचे नाव आहे. या अपघातात अन्य सहाजण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लग्नसमारंभाकरिता हे सर्वजण विंगरमधून (एमएच 18 डब्ल्यू 0188) निघाले होते. राहुरीजवळील महात्मा कृषी विद्यापीठानजीक समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विंगर दुभाजकावर आदळून उलटली. हा अपघात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना नगरला हलवले. थोड्याच वेळात पोलिस घटनास्थळी आले. जखमींपैकी रियाज गफार अहमद (19), शाहिद महेबूब शेख (19), शाहरुख हमीद शेख (19), फहाज खान नजीर (18, सर्वजण मुकुंदनगर, नगर), अमजद हमीद शेख (30, कोठला, नगर) व साजीदखान हमीद खान (30, झेंडीगेट, नगर) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर इतर काही युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.