आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणावरील हल्ल्याप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लाकडी दांडके, लोखंडी पाइप व दगडाने मारहाण करून सागर ढवण या तरुणास गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.
सागर दत्तात्रेय ढवण (23, ढवणवस्ती, तपोवन रस्ता ) यास दहा- पंधराजणांच्या टोळक्याने पाइपलाइन रस्त्यावरील बायजाबाई सोसायटीजवळील नूतन शाळेसमोर 29 नोव्हेंबरला मारहाण केली होती. जखमी सागरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारहाण करणा-या टोळक्याने परिसरात दगडफेक व गाड्यांची मोडतोड करून दहशत निर्माण केली होती. नंतर हे टोळके फरार झाले होते.सागरने दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी प्रवीण शांताराम बरबडे (23, बरबडेवस्ती), अंकुश दत्तू चत्तर (23, पद्मानगर, पाइपलाइन रस्ता), अविनाश शंकर इरावत (20, पाइपलाइन रस्ता), नीलेश शंकर भगन (21, तपोवननगर) व संदीप बाबूराव गायकवाड (24, तपोवननगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. प्रवीणला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. उरलेल्या चार आरोपींना बुधवारी दुपारी दीड वाजता तोफखाना पोलिसांनी चतुराईने अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली.
आरोपी अंकूश चत्तर याच्याविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्दच्या तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिका-यांकडे पाठविला असून हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.