आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉडच्या साह्याने युवकाला मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - महाविद्यालयीन युवकाला जमावाने रस्त्यात गाठून काठी, रॉडच्या साह्याने मारहाण केली. ही घटना बोरावके महाविद्यालयाजवळ सायंकाळी झाली. शहर पोलिसांनी गुंड टिप्या बेगसह सातजणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
टिप्या अशोक बेग, निखिल सानप, लखन माखिजा, ऋषिकेश वाबळे, मनू वैद्य, गारेख जेधे, जीतू जेधे अशी आरोपींची नावे असून त्यांनी केलेल्या मारहाणीत साहिल निसार पठाण (१७, प्रभाग २) जखमी झाला. साहिल सायंकाळी मोटारसाकलीवरून जात होता. जमावाने त्यास अडवून शिवीगाळ केली. त्यास लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली. मोटारसायकलीचेही मोठे नुकसान करण्यात आले. शहर पोलिसांनी याप्रकरणी सातजणांविरूद्ध मारहाण दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.