आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसखाली तरुणाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांची समजूत काढताना निरीक्षक नितीन चव्हाण. छाया: विवेक भिडे. - Divya Marathi
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांची समजूत काढताना निरीक्षक नितीन चव्हाण. छाया: विवेक भिडे.
संगमनेर - एसटीबस खाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरल्याची घटना तालुक्यातील चंदनापुरी येथे मंगळवारी सकाळी घडली. संदीप मारुती राहणे (वय ३०, चंदनापुरी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत संदीप हा संगमनेर तालुका दूध संघात गुणनियंत्रण विभागात कामाला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी शिवारात हा अपघात झाला. यात संदीप राहणे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक बाह्यवळण मार्गाने बस घेऊन पसार झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.