आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने उद्या सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - तालुक्यात प्रथमच आयोजित युवा साहित्य संमेलनाचा शुभारंभ मंगळवारी (५ जानेवारी) सकाळी आठ वाजता शहरातून काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीने होणार असल्याची माहिती पत्रकार उदय शेरकर, दत्ता झगडे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळ, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर तालुका पत्रकार संघातर्फे मंगळवारपासून पारनेर महाविद्यालयात युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले अाहे.
तालुकावासियांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, साहिित्यक डॉ. सदानंद मोरे साहित्यिकांच्या मांदियाळीचा सहवास लाभणार आहे.
मराठी राजभाषा पंधरवडा दिन पत्रकार दिनाचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता मुख्य उद्घाटन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असतील. या संमेलनामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील प्रतिभावान साहित्यिक कवींना प्रथमच सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे संयोजन समितीच्या प्रा. वैशाली भालसिंग, प्रा. प्राजक्ता ठुबे, प्रा. राणी शेख, पत्रकार विजय वाघमारे यांनी सांगितले.