आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून संगमनेरमध्ये तरुणाचा खून; तिघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - शिक्षकावरील गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारीरात्री अनैतिक प्रेमसंबधातून खुनाची घटना घडली. प्रियकर-प्रेयसीतील वादात प्रियकराच्या भावाचा हकनाक बळी गेला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. रमाकांत चंद्रकांत झांबरे (२५, जनतानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
मीना शिवाजी सोनवणे (३२, लक्ष्मीनगर), सुशीला विलास देवकर (३६) आकाश विलास देवकर (१९, दोघे घुलेवाडी) अशी आरोपींची नावे अाहेत. राजेंद्र चंद्रकांत झांबरे (३०) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. राजेंद्र विवाहित आहे. त्याचे मीना सोनवणेशी वर्षभरापासून प्रेमसंबध होते. पती-पत्नीच्या विवादामुळे राजेंद्रने हे प्रेमसंबंध सहा महिन्यांपूर्वी तोडले.
त्याचा राग मनात धरून मीना आणि तिच्या नातेवाईकांनी राजेंद्रला त्रास देण्यास सुुरुवात केली. शनिवारी त्यांनी राजेंद्रला घरी बोलावले, पण तो आल्याने मीनाने फोन करून तीच त्याच्या घरी येत असल्याचे सांगितले. मीनासमवेत सुशीला देवकर, तिचा मुलगा आकाश आणि आणखी दोन अल्पवयीन मुले होती. जनतानगरमध्ये येऊन त्यांनी झांबरे कुटुंबीयांना शिवीगाळ करत राजेंद्र योगेश झांबरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारी भावाच्या घरात सुरू असलेला गोंधळ ऐकून रमाकांत भांडण सोडवण्यास गेला असता मीनाने त्याचे दोन्ही हात पाठीमागून पकडले आणि सुशीलाने स्वयंपाकाच्या कुकरने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे रमाकांत खाली पडला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...