आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा व्यसनाधीन झाले तर देश महासत्ता होणार कसा?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आज युवकवर्ग मोठ्या प्रमणात व्यसनांच्या विळख्यात गुरफटला जात आहे. देशाचे भावी आधारस्तंभ असलेली युवा पिढीच जर व्यसनाधिन झाली तर देश महासत्ता होणार कसा? अशी खंत शिर्डी येथील समाज प्रबोधनकार भाऊ थोरात यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या डिग्रस (ता. राहुरी) शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती भीमराज हारदे, सदस्य सचिन भिंगारदे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब पवार, बापूसाहेब गिरगुणे, मंगल बेल्हेकर यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, मुले वयात येतानाच त्यांचे मावा, गुटखा यांसारख्या व्यसनांमध्ये आकृष्ट होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्याची गरज आहे. पालक आणि शिक्षक यांची ती सामूहिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. डिग्रस शाळेचे विविध उपक्रम व मुख्याध्यापिका कांता घावटे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कांता घावटे यांनी शाळेत वर्षभर राबवण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.