आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाई जपतेय सांस्कृतिक परंपरा, शहरात वाढतेय ढोल पथकांची क्रेझ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मोबाइल,इंटरनेट या आधुनिक तंत्रज्ञानात गुंतलेल्या आजच्या तरुणाईला जुन्या पिढीकडून नेहमीच हिणवले जाते. या तरुणाईला कर्णकर्कश डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारे, गर्दीत येणारा दारूचा भपका, चंगळवादात अडकलेले, अशी ओरड तुम्ही करत असाल तर थांबा. कारण आज याच तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिकतेचा ट्रेंड रुजतो आहे.
पर्यावरण, प्रदूषण यासोबतच सामाजिक सौख्य जपताना हीच तरुणाई आघाडीवर दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरात वाढत असलेली ढोल पथकांची संख्या. काही तासासाठी डीजेवर केला जाणारा लाखो रुपयांचा चुराडा कमी होताना दिसत आहे. म्हणूनच यंदा गणेशाचे स्वागत डीजेच्या तालावर नव्हे, तर पारंपरिक ढोल, ताशांच्या गजरात करण्यात आले.
गणपती ढोल म्हटले की आधी डोळ्यांसमोर नाव याचचे, ते नाशिक, पुणे ढोल यांचे. आता या गोष्टीमध्येही मागे राहील ते आपले नगरकर कसले! सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचा ठेवा जपणाऱ्या नगरकरांना गेल्या तीन वर्षांपासून नगरी ढोलचा आवाज ओळखीचा वाटू लागला आहे आणि आता, तर अभिमानाने हा नगरी ढोल शहरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतो आहे. पायाचा आधार घेत मोठे-मोठे ढोल पेलत जोशाने ढोल बडवणाऱ्या पथकांच्या तयारीला वेग आला आहे. त्याला मिळणारी ताशाची साथ. यापूर्वी शहरातील कार्यालये, सोसायट्या, गल्लीबोळा, मंगल कार्यालये कर्णकर्कश डीजेचा आवाज सहन करत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हेच लोक ढोलच्या तालाच्या आवाजावर बसल्याजागी पाय थिरकवत आहेत.

ढोल पथकात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे. ना शिक्षणाची, ना इतर कुठलीही. फक्त अट आहे ती हौशेची, आवडीची. ढोलाच्या तालावर वादकाची वाढत जाणारी झिंग आसमंत निनादून टाकते आहे. विशेष म्हणजे या पथकांमध्ये महिलांचा वाढत जाणारा सहभाग आता लोकांच्या कौतुकासही पात्र ठरत आहे. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक पथकाचा चाललेला आटापिटा, एक वेगळी शैली, हटके, लेटेस्ट ट्रेंडला सूट होईल असा, पण महाराष्ट्रीयन टच असलेला पोषाख. पारंपरिक ढोल-ताशाच्या तालावर लाडक्या गणरायाचे स्वागत मन मोहून टाकणारेच आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी अनेक ढोल पथकांनी आपले नेत्रसुखद कला कौशल्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. अाता विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी ढोल पथकं सज्ज झाली आहेत.

सरावातचखरा आनंद
इंजिनिरिंगचीविद्यार्थिनी आहे. दोन वर्षांपासून ढोल पथकात सहभागी आहे. ढोल म्हणजे मेडीटेशन आहे. रोजच्या सरावामुळे मला रिफ्रेश वाटते. ढोल पथकाचे वाढते प्रमाणही नगरकरांकडून होणाऱ्या कौतुकाची पावतीच आहे, असे रिदम नगरी ढोलपथकातील अनुराधा कोंडेकर यांनी सांगितले.
शहरातील विविध ढाेल पथके नगरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ध्वजाचा दिमाख लक्षवेधी
पथकामध्ये ज्याप्रमाणे ढोल, ताशाला महत्त्व असते तेवढाच मान ध्वजाला असतो. पथकामध्ये मानाचा ध्वज असून त्याच्या साथीला सहा ध्वज आहेत. पथकाचे हे पहिलेच वर्ष असून मी पथकामध्ये ध्वजधारी आहे. डीजेवरील बंदीमुळे प्रदूषणाला आळा बसत आहे. प्रदूषण विरहित सण करण्याची मजा काही औरच असते.'' मंजुश्रीजाधव, रुद्रनाद वाद्यपथक.

ढोलसंस्कृती रुजावी
ऐतिहासिक नगर शहरात गणेशोत्सवासाठी नेहमीच डीजेचा वापर व्हायचा. पण, मागील वर्षांपासून ढोल पथकामुळे नगरमध्ये ढोल संस्कृती रुजते आहे. ढोल पथकात असताना वादनासोबत स्वयंशिस्त असावी लागते. डीजेमुळे होणारा त्रास कुठेतरी कमी व्हावा, याकरिता पुष्कर तांबोळी, ओंकार गिते यांसारख्या काही ढोलप्रेमी मित्रांनी एकत्र येऊन ढोल पथकाची स्थापना केली.'' विराजसांगळे, रुद्रनादवाद्यपथक.

वल्लभचा उत्साह अवर्णनीय
रिदमग्रूपमध्ये बालवाडीतील वर्षांचा चिमुरडा वाद्यप्रेमी आहे. वल्लभ अतुल गायकवाड. हातात छोटेसे टिपरू घेऊन तो ढोल सांभाळतो. वल्लभ ढोल पथकाच्या सादरीकरणात सर्वांचे लक्ष वेधून घेतो. दोन तास थकता तो ढोल वाजवतो. म्हणूनच तो कौतुकाचा विषय बनला आहे.

पावले आपोआप थिरकतात
रोज संध्याकाळी वाजता माझी पाऊले आपोआप सरावाच्या ठिकाणी वळायला लागतात. या ढोल पथकाच्या रूपाने आमचे एक छान कुटुंब तयार झाले आहे. कॉलेजच्या असाईनमेंट्स, प्रॅक्टिकल्स यामधून वेळ काढताना होणारी कसरतही आम्ही एन्जॉय करतो.'' सागरचव्हाण, रिदम नगरी ढोलपथक.

ढोलमुळे वेगळी ओळख
ढोल पथकामध्ये सहभागी होण्याचे मुख्य कारण म्हणजे गणपती उत्सवामुळे ढोल पथकाला मिळालेली प्रतिष्ठा आणि ढोल पथकांनी जपलेले नावीन्यपण. ढोल पथकाचा ताल अंगावर शहारे आणणारा असतो. ढोल पथकामुळे एक वेगळी ओळख तयार होण्यास मदत होते. पारंपरिकरित्या सण-उत्सव साजरे करण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत आहे. ढोल पथकामुळे उत्तम प्रकारचे मॅनेजमेंट शिकायला मिळते आहे.'' विजयआगरकर, रुद्रवंश ढोलपथक.

हौसेला मोल नाही
आम्ही दोघी माय-लेकी देखील पथकामध्ये सहभागी आहोत. मागच्या वर्षी मिरवणूक पाहण्यासाठी गेलो असता आम्हाला ढोल पथकात सामील होण्याची इच्छा झाली. गृहिणी असल्यामुळे मला रोजच्या कामाच्या व्यापातून स्वत:साठी थोडा वेळ मिळतोय ही गोष्टच खूप सुखावून टाकणारी आहे. शिवाय कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाल्यामुळे रोज सरावासाठी वेळ देता येणे शक्य होते. मुलीची हौसही पूर्ण करता आली, याचे समाधान वाटते.'' श्वेताकुलकर्णी, रिदम नगरी ढोलपथक.

आबालवृद्धांचा सहभाग
तालयोगी प्रतिष्ठानच्या ढोल पथकात ३५ ते ४० मुलींचा ग्रूप अाहे. सुमारे १०० मुले या पथकात आहेत. सात वर्षांच्या मुलापासून ते ५५ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सर्वजण यामध्ये सहभागी होऊ शकतात. मोठ्या ढोलाचे वजन हे १२ ते १३ किलो असून, लहान मुलासाठी ते किलो वजनाचे ढोल उपलब्ध आहेत. तालयोगी ढोल पथक दोन प्रकारचे वादन करते. त्यात स्थिर वादन एक ते दीड तास, तर मिरवणूक वादन हे ते तास चालते. वाद्यांची दुरुस्ती, पथकातील लोकांचा अल्पोपाहार, वाहनाची व्यवस्था मंडळातून मिळणाऱ्या शुल्कातून केली जाते.'' विकीवाघ, तालयोगी प्रतिष्ठान.

ध्वनिप्रदूषणाला आळा
ढोलपथकाच्या माध्यमातून काळाच्या ओघाने दूर होत चाललेल्या चालीरिती पुन्हा रुजत आहेत. अशा परंपरा या माध्यमातून नव्याने सुरू होण्याचा एक चांगला मार्ग आहे. काळानुरूप ढासळत चाललेली युवा पिढी एकत्र येत आहे. चांगल्या प्रकारे आपली पारंपरिक कला सादर करणे, तसेच वाद्यांतून निघणारा सुमधुर नाद ध्वनिप्रदूषणाला नक्कीच आळा घालणारा ठरतो. नगरमधील युवापिढीला पोषक असे सांस्कृतिक संगीतमय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जाते.'' प्राचीपाठक, तालयोगी प्रतिष्ठान.

ढोलला नवी उभारी
मी २०१३ मध्ये स्थापन झालेल्या रिदम ढोलपथकाचा अध्यक्ष म्युझिशियन आहे. मी स्वत: ड्रमवादक असून शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्याचे धडे गिरवले आहेत. नगरमधील स्थानिक कलाकारांना एक मंच उभा करण्याच्या दृष्टिकोनातून ढोल पथकाची स्थापना केली आहे. सांस्कृतिक कलेतील ढोलला नव्याने उभारी यावी त्याची जपवणूक व्हावी हा यामागे हेतू आहे.'' राहुलशेलार, अध्यक्ष, रिदम नगरी ढोलपथक.

सांस्कृतिकपणा जपावा
लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप दरवर्षी बदलत चालले आहे. डीजेच्या तालावर ओंगळवाणे अंगविक्षेप करून नाचणारी तरुणाई भारतीय संस्कृतीचा अपमान करते. आजच्या तरुणाईने सांस्कृतिकपणा जपला पाहिजे. हा ढोल पथकामागचा स्तुत्य हेतू आहे. दहा दिवस गणपती बाप्पासमोर ढोल वादन केल्यामुळे वर्षभराची ऊर्जा मिळते. तसेच ढोल पथकांना नगरकरांचीही पसंती मिळत आहे. '' किरणवाकचौरे, रुद्रनाद वाद्यपथक.