आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना सौर कृषी फीडरची वीज; मुख्यमंत्र्यांची माहिती : 42 लाखांवर शेतकऱ्यांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी | नगर  
‘देशाला ग्रामविकासाचा संदेश, परिवर्तन व प्रेरणा देणाऱ्या राळेगणसिद्धीत देशातील पहिले सौर कृषी वाहिनी फीडर हाेत अाहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध होणार असून सरकारचे अनुदानापोटीचे किमान ५ हजार कोटी रुपये वाचतील. येत्या ३ वर्षांत राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीवरून वीजपुरवठा करण्यात येणार अाहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.   


राळेगणसिद्धीत शनिवारी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ग्रामरक्षक दलाची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते.  मुख्यमंत्री म्हणाले, सामान्यांना अवैध दारू रोखण्याचे अधिकार मिळावे व अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित व्हावी, या दृष्टीने अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कायदा तयार केला आहे. त्यातून ग्रामस्थांना अवैध दारू रोखण्यासाठी अधिकार मिळतील. 

सुरक्षा कडे तोडून जाणारा तरुण ताब्यात 
नगर तालुक्यातील मेहकरी येथील प्रशांत महादेव कानडे या मूकबधिर तुुरुणाने बँकेत नोकरी मिळावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सुरक्षा कडे तोडून घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला रोखले. तरुणाकडे पाण्याची मोकळी बाटली तसेच निवेदन होते.

काय आहे प्रकल्प

३ कोटींतून २ मेगावॅट क्षमतेचा सौर कृषी फीडर उभारण्यात येणार आहे. तो ग्रीडला जोडलेला असेल. म्हणजेच सौर फीडरसह महावितरणच्या फीडरवरूनही ६०० शेतकऱ्यांना वीज मिळेल. मार्च २०१८ पूर्वी राज्यात ४३५ मेगावॅटचे प्रकल्प उभारले जातील. राळेगणमधील शेतकऱ्यांना सौर फीडरवरील वीज प्रतियुनिट १.१० रुपयांत मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...