आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Try To Committing Suicide Before The Home Of Thorat

थोरातांच्या घरापुढे तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- वडिलांच्या जागेवर नोकरी मिळत नसल्याने हतबल झालेल्या 26 वर्षांच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सचिन दत्तू गुंजाळ असे त्याचे नाव असून पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

सचिनचे वडील संगमनेर नगरपालिकेत रोजंदारी कामगार होते. कालांतराने त्यांना शासनाने सेवेत कायम केले. सात वर्षांपूर्वी कामावर असताना शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमेवेळी त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी सचिन प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. रोजंदारी कामगारातून त्याच्या वडिलांना सेवेत कायम करण्यात आल्याने अनुकंपा तत्त्वाचा नियम लागू होत नसताना काहीजणांनी त्याला नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते.

नोकरी मिळत नसल्याने हतबल झालेल्या सचिनने महसूलमंत्री थोरात यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास थोरात यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या तक्रारीवरून सचिनच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.