आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनूससह १९ जणांच्या टोळी विरुद्ध मोक्‍का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाळूव्यवसायातून उदभवलेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणारा कुख्यात गुंड युनूस शेख (मुंगी, ता. शेवगाव) याच्यासह १९ जणांवर मोक्कानुसार कारवाईचे आदेश मिळाले आहेत. या टोळीने फेब्रुवारीत मुंगी येथे धुमाकूळ घातला होता.
युनूस चाँद शेख, अहमद चाँद शेख, चाँद सरदार ऊर्फ उस्मान शेख, प्रज्ञा ऊर्फ आएशा युनूस शेख (चौघेही मुंगी), राजू मोहंमद हनिफ सुभान यासीन शेख (दोघे कुरणपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), रफिक ईस्माइल शेख (मुंगी) नईमखान कासीमखान पठाण (शेवगाव), मुजाजदिन ऊर्फ मुंजा इब्राहिम पठाण (कुरण पिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), रईस मोहंमद हनिफ शेख (कुरण पिंप्री), अर्शद ऊर्फ आयुब यासीन शेख (कुरण पिंप्री), सलमान अहमद शेख, भय्या अहमद शेख, नसीर महंमद शेख, हफिज बशीर शेख, विजय चांदुजी काळे भानुदास नाथा घोरपडे (सर्व मुंगी) यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई होणार आहे.

या टोळीने विठ्ठल सोनराव मुंडे (पिंगेवाडी, ता. शेवगाव) यांच्यावर गज, काठ्या, तलवारीने हल्ला केला, तसेच डंपर, पोकलेन मशीन रॉकेल टाकून जाळले होते. याशिवाय सर्व आरोपींविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, भारतीय हत्यार कायदा कलमान्वये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.