आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींविरोधात संघर्ष तीव्र करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तास्थानी पोहोचले आहेत. इंग्रजाच्या जोखडातून देश स्वतंत्र करणे सोपे होते. मात्र, मोदींपासून देशाला स्वतंत्र करणे कठीण आहे. त्यांच्याविरोधात संघर्षाची धार आम्ही तीव्र करणार आहोत, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा यांनी सांगितले.

युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायंकाळी सहकार सभागृहात आयोजित करण्यात युवा संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे राज्य प्रभारी हिंमत सिंग, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, जलि्हाध्यक्ष हेमंत ओगले, काँग्रेसचे प्रभारी शहर जलि्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

राजा म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना भरमसाट आश्वासने देऊन दिशाभूल करत मोदी सत्तास्थानी पोहचले. वर्ष उलटून गेले, तरी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून झालेली नाही. ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेसकडून जनजागृती करण्यात येईल.

मोदी यांनी त्यांच्या लग्नाबाबतही जनतेला अंधारात ठेवले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांचे लग्न झाल्याची माहिती बाहेर आली. खोटे बोलणारा पंतप्रधान देशाला मिळाला. गांधी परिवाराप्रमाणे देशासाठी समर्पित जीवन जगणारा एकही नेता भाजपमध्ये नसल्याचा हल्ला राजा चढवला. अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झाली.

उपमहापौर, नगरसेवकांची पाठ
युवककाँग्रेसच्या कार्यक्रमाकडे उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली. प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, जलि्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे हे नेतेही मेळाव्याकडे फिरकले नाहीत. यामागे काँग्रेस अंतर्गत असलेल्या गटातटाचे राजकारण असल्याची मेळाव्यात चर्चा होती.
बातम्या आणखी आहेत...