आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad Bogus Handicap Issue At Ahmednagar

39 शिक्षकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी 39 शिक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती जाधव यांनी गुरुवारी न्यायालयीन कोठडी दिली. अटकेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट प्रमाणपत्र पुरवणार्‍या मध्यस्थांनाही यात आरोपी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींच्या संख्येत 88 पर्यंत वाढ झाली असून त्यातील 58 जणांना अटक करण्यात आली आहे. 14 जानेवारीला हजर झालेल्या 28 शिक्षकांना 17 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. 15 ला 11 शिक्षक हजर झाले. त्यांनाही 17 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. मुदत संपल्याने 39 शिक्षकांना गुरुवारी हजर करण्यात आले. सरकार पक्षाची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळून लावत या शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.