आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत शाळेत सत्कार !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कर्जत तालुक्यातील घुमरी येथील शाळेचा संस्थांतर्गत वाद सुरू असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी तेथील गुणवंतांच्या सत्काराला हजेरी लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शाळा अनधिकृत असताना गुंड यांनी सत्कार स्वीकाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी सीना ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम अनभुले यांनी मुख्य कार्यकारी अधिका-याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे की, संस्थेच्या गुरुदत्त व्यालयाची चोरी नोव्हेंबर २०१४ रोजी मान्यताप्राप्त इमारतीतून झाली. ही शाळा चोरून गावातील अनधिकृत बेकायदेशीर जागेत सुरू करण्यात आली. संस्थापक अध्यक्षांना शिक्षण विभागाला कोणतीही पूर्वकल्पना देता शाळा स्थलांतरित करण्यात आली. अशा चोरी झालेल्या शाळेची शिक्षण खात्याने चौकशी करून दोन अहवाल तयार केले. त्यात ती शाळा अनधिकृत असल्याचे सिध्द झाले. असे असतानाही जि. प. अध्यक्ष गुंड २२ जूनला या शाळेत गेल्या. त्यावेळी अॅड. शिवाजी अनभुले यांनी शिक्षकांचे थांबवलेले वेतन पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे मांडली. शाळा अनधिकृत असतानाही त्या ठिकाणी अध्यक्ष गुंड यांनी सत्कार स्वीकारणे योग्य नव्हते, असेही निवेदनात म्हटले आहे.
शाळा स्थलांतरप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच सदस्य प्रवीण घुले यांनी आगपाखड करून बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतरित केल्याचे म्हटले होते. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांना घुले यांनी धारेवर धरले होते. त्यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता थेट अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्याने शाळा स्थलांतराचा वाद आणखी चिघळणार आहे. या संपूर्ण घडामोडींना स्थानिक राजकीय पार्श्वभूमी आहे.

यात काहीच गैर नाही
घुमरी शाळेतील व्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले. एक व्यार्थी गरीब परिस्थिती असताना ९४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला. त्या व्यार्थ्यांच्या गौरव समारंभासाठी मी गेले होते. यात काही गैर नाही, असे मला वाटते.'' मंजूषागुंड, अध्यक्ष, जि. प.

अनधिकृत असल्याचे कोणी ठरवले?
^जिल्हापरिषद अध्यक्ष मंजूषा गुंड शाळेतील गुणवंत व्यार्थ्यांच्या गौरव समारंभासाठी आल्या होत्या. त्यात काहीच चुकीचे नाही. घुमरी येथील शाळेच्या ख नोंदीनुसार शाळा गावातच आहे. पण २०५ गट क्रमांक खाडाखोड करून मांडला आहे. तसेच ही शाळा अनधिकृत असल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही. तो निर्णय प्रलंबित आहे.'' अॅड.शिवाजी अनभुले, घुमरी.
बातम्या आणखी आहेत...