आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या २०० जागांसाठी २८ हजार अर्ज, २४ केंद्रांवर होणार परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.रिक्त जागांपैकी सुमारे २०० जागांसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यात आले असून सोमवारपर्यंत २८ हजार १२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहरातील एकूण २४ केंद्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून रिक्त जागा अाहेत. दरवर्षी रिक्त जागांमध्ये भर पडत आहे. रिक्त जागांमुळे त्याचा ताण कार्यरत असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळावर वाढत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी आग्रही असलेल्या शासनाच्या धोरणालाही अपुऱ्या मनुष्यबळामुळे खीळ बसली आहे. त्यामुळे रिक्त जागा भरण्याची मागणी सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने भरती जाहीर केली आहे. पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक महिला, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अारोग्य सेवक (पुरुष), परिचर, आैषध निर्माता, कनिष्ठ सहायक लिपिक, कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहायक लिपिक, कंत्राटी ग्रामसेवक (पेसा), अारोग्य महिला (पेसा), तसेच राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास सल्लागार, वित्त नि संपादणूक अधिकारी, मूल्यमापन एमआयएस सल्लागार, शिपाई, गट समन्वयक, समूह समन्वयक, ग्रामलेखा समन्वयक ही पदे भरली जाणार आहेत.
या पदांच्या भरतीसाठी ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. एकूण पदांची संख्या सुमारे २०० असतानाही तब्बल २८ हजार १२७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
ऑनलाइनलाअडचण
ऑनलाइनअर्ज भरताना सर्व्हर व्यस्त असल्याची अडचण येत असल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. वेळ कमी राहिल्याने उमेदवारांचीही धाकधूक वाढली असताना, जिल्हा परिषदेने तत्काळ संबंधित एजन्सीला कळवण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक कारणांमुळे अनेकजणांना अडचणी आल्या.
प्रतिनिधी | नगर
जिल्हापरिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.रिक्त जागांपैकी सुमारे २०० जागांसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यात आले असून सोमवारपर्यंत २८ हजार १२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहरातील एकूण २४ केंद्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून रिक्त जागा अाहेत. दरवर्षी रिक्त जागांमध्ये भर पडत आहे. रिक्त जागांमुळे त्याचा ताण कार्यरत असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळावर वाढत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी आग्रही असलेल्या शासनाच्या धोरणालाही अपुऱ्या मनुष्यबळामुळे खीळ बसली आहे. त्यामुळे रिक्त जागा भरण्याची मागणी सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने भरती जाहीर केली आहे. पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक महिला, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अारोग्य सेवक (पुरुष), परिचर, आैषध निर्माता, कनिष्ठ सहायक लिपिक, कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहायक लिपिक, कंत्राटी ग्रामसेवक (पेसा), अारोग्य महिला (पेसा), तसेच राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास सल्लागार, वित्त नि संपादणूक अधिकारी, मूल्यमापन एमआयएस सल्लागार, शिपाई, गट समन्वयक, समूह समन्वयक, ग्रामलेखा समन्वयक ही पदे भरली जाणार आहेत.
या पदांच्या भरतीसाठी ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. एकूण पदांची संख्या सुमारे २०० असतानाही तब्बल २८ हजार १२७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
ऑनलाइनलाअडचण
ऑनलाइनअर्ज भरताना सर्व्हर व्यस्त असल्याची अडचण येत असल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. वेळ कमी राहिल्याने उमेदवारांचीही धाकधूक वाढली असताना, जिल्हा परिषदेने तत्काळ संबंधित एजन्सीला कळवण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक कारणांमुळे अनेकजणांना अडचणी आल्या.
जास्त अर्ज आलेली पदे
पदजागा अर्ज
पर्यवेक्षिका०५ ९००
आरोग्य से. (महिला) ८१ १५३३
कनिष्ठ लेखाधिकारी ०१ १०२
वरिष्ठ स. लेखा ०२ ३३४
स्था. अभियांत्रिकी ०४ ९११
आरोग्य से. (पुरुष) १३ १२०७
परिचर ३१ १०६४०
आैषध निर्माता ०४ ७८७
क.सहायक लिपिक १३ ३५९५
कंत्राटी ग्रामसेवक ३३ ३५९५
विस्तार अधिकारी ०१ ८९
वरिष्ठ स. लिपिक ०३ १४३५
अर्जांची संख्या वाढणार
अर्जभरण्याची मंगळवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) असल्याने अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील २४ केंद्रात एकाच वेळी २० हजार परीक्षार्थी बसवता येतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु, विविध पदानुसार भरतीच्या तारखा वेगळ्या असल्याने नियोजनात अडचण नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.