आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया झाल्यानंतरही ७०० पदे राहणार रिक्त, अनुकंपावरही अन्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हापरिषदेत सुमारे साडेनऊशे पदे रिक्त आहेत, परंतु वेतनावरील खर्च कमी करण्याच्या धोरणामुळे रिक्त पदांच्या तुलनेत अवघी १९५ पदे जिल्हा परिषदेमार्फत भरली जाणार आहेत. त्यामुळे भरती होऊनही सुमारे ७०० पदे रिक्त राहणार आहेत. त्यातच भरतीच्या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल झाला आहे. आता २५ नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्हा परिषदेत नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे, पण प्रत्यक्ष प्रक्रियेला अजून मुहूर्त लागलेला नाही. भरतीची तारीख प्रथम नोव्हेंबर होती. पण ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण दाखवून ही तारीख नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यांदा या वेळापत्रकात बदल करून २५ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. वेतनावरील खर्च कमी करण्याचे वित्त विभागाचे धोरण असल्याने एकूण रिक्त जागांच्या ५० टक्के अथवा संबंधित संवर्गातील टक्के जागा यापैकी जी संख्या कमी असेल, तेवढ्या जागा भरण्याचे संकेत दिले. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्याच जागा भरल्या जातील, असे सर्वप्रथम दिव्य मराठीने निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार अवघ्या १९५ जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त असल्याने या पदांचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी तणावात आहेत, परंतु कोणीही उघड बोलायला तयार नाही. रिक्त जागांच्या तुलनेत भरतीची संख्या अवघी १९५ असल्याने ही भरती होऊनही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे सर्वच रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठीची प्रतीक्षा यादी मोठी असून रिक्त जागांच्या दहा टक्के या जागा भरण्याचे निर्देश होते. परंतु शासनाने कोणतेही मार्गदर्शन दिल्याने भरती प्रक्रियेच्या दहा टक्केच अनुकंपा तत्त्वाला प्राधान्य दिले जाणार आहे.
२५नोव्हेंबरला औषधनिर्माता, वरिष्ठ सहायक, कृषी अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष, महिला), कनिष्ठ आरेखक, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (कृषी), २८ नोव्हेंबरला वरिष्ठ सहायक (लिपिक), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लिपिक), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी (शिक्षण) २९ नोव्हेंबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), लघुलेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, परिचर, पट्टीबंधक, डिसेंबरला कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, जोडारी, कनिष्ठ यांत्रिकी, तारतंत्री, विस्तार अधिकारी पंचायत, आरेखक, स्थापत्य अभियांित्रक आदींची भरती प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.