आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणात दिग्गजांना धक्का, नवीन रद्द झालेले गट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७३ गटांच्या जागांचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. या सोडतीत जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड यांचा गटच रद्द झाला, तर उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा बेलवंडी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. सभापती नंदा वारे यांचा जवळा गटही अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. सोडतीत दिग्गजांना चांगलाच धक्का बसला. पक्ष निरीक्षकांसाठी उमेदवार निश्चितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दिवसभर जिल्ह्यातील नेतेमंडळी नवी समीकरणे जु‌ळवण्यात व्यग्र होती.
आरक्षण सोडत जिल्हा नियोजन भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी आनंद आनंदकर, तहसीलदार गणेश मरकड आदी उपस्थित होते.

सोडत काढताना २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिक निवडणुकांत दिलेल्या आरक्षणाचा विचार करण्यात आला. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग, सर्वसाधारण जागांसाठीचे आरक्षण निश्चित केले. त्यानंतर महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची सोडत झाली. मागील तीन पंचवार्षिकमध्ये निश्चित गटात आतापर्यंत एकदाही नाही, किंवा इतर गटांच्या तुलनेत कमी वेळा आरक्षण मिळालेल्या गटांत महिलांना थेट आरक्षण देण्यात आले. ज्या गटांमध्ये महिलांचे आरक्षण सारखेच राहिले होते, अशा गटांसाठी आवश्यकतेनुसार आरक्षण काढण्यात आले.

जि. प. अध्यक्ष गुंड या बारडगाव सुद्रिक गटातून २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. कर्जत गटातून राजेंद्र फाळके निवडून आले होते. आगामी निवडणुकीत हे दोन्ही गट रद्द झाले आहेत. उपाध्यक्ष शेलार यांचा बेलवंडी बुद्रूक गट महिलेसाठी राखीव झाला आहे. अनुसूचित जातीसाठी गट वारी, भानसहिवरे, सोनई, बोधेगाव, भातकुडगाव, कुळधरण, राशीन, खर्डा, जवळा हे गट आरक्षित झाले. त्यापैकी याच प्रवर्गात महिला आरक्षण देताना भानसहिवरे, सोनई, खर्डा थेट महिलांसाठी आरक्षण देण्यात आले. उर्वरित सहा गटांच्या सोडतीत वारी बोधेगाव गट महिलांसाठी आरक्षित झाले. अनुसूचित जमातीसाठी जोर्वे, पुणतांबे, कोल्हार बुद्रूक, उंदीरगाव, टाकळीभान, टाकळीमिया, ब्राह्मणी हे गट आरक्षित झाले. त्यापैकी याच प्रवर्गातील गटांत महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार जोर्वे, उंदिरगाव, टाकळीभान, टाकळी मियाँ थेट आरक्षित करण्यात आले.नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी धांदरफळ बुद्रूक, संगमनेर खुर्द, बोटा, चांदेकसारे, वाकडी, लोणी खुर्द, कुकाणा, भेंडा बुद्रूक, खरवंडी, चांदा, माळी बाभुळगाव, मिरी, टाकळी मानूर, देहरे, जेऊर, दरेवाडी, बारागाव नांदूर, टाकळी ढोकेश्वर, येळपणे, कारेगाव हे २० गट आरक्षित झाले. त्यापैकी चांदेकसारे, वाकडी, लोणी, कुकाणा, चांदा, माळी बाभुळगाव, टाकळी मानूर,येळपणे, कारेगाव हे १० गट याच प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत. सर्वसाधारणसाठी ३७ गट खुले आहेत. यापैकी १९ जागांवर सर्वसाधारण महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

७३ जागांसाठी होणार निवडणूक
गट,गण रचना करताना सन २०११ ची जनगणना विचारात घेण्यात आली. जिल्हा परिषदेत २०१२ च्या निवडणुकीवेळी ७५ गट होते. २०१७ च्या निवडणुकीसाठी ७३ गट झाले आहेत. त्यापैकी काही गट रद्द झाले, तर नव्याने काही गटांची भरही पडली आहे. त्यामुळे राजकीय गणिते जुळवण्यासाठी कसरत सुरू आहे.

गटरचना करताना काही गट रद्द झाले, तर काही नवीन गट निर्माण झाले. त्यात धामणगाव आवारी नवीन, अकोले रद्द (अकोले), वडगाव पान, संगमनेर खुर्द, समनापूर नवीन, तर निमोण तळेगाव रद्द (संगमनेर), चांदे कसारे, वारी नवीन गट, तर संवत्सर, पोहेगाव गट रद्द (कोपरगाव), उंदीरगाव नवीन गट, तर निपाणी वडगाव रद्द (श्रीरामपूर), बेलपिंपळगाव नवीन, तर नेवासे गट रद्द (नेवासे), मुंगी, शेवगाव, वरूर बुद्रूक रद्द, तर लाडजळगाव भातकुडगाव नवीन गट (शेवगाव), तीसगाव रद्द तर माळी बाभुळ टाकळ नवीन गट (पाथर्डी), अरणगाव, चिचोंडी पाटील रद्द, तर जेऊर, दरेवाडी नवीन गट (नगर), पारनेर, वाडेगव्हाण गट रद्द, तर सुपा नवीन गट (पारनेर), कर्जत, बारडगाव सुद्रिक गट रद्द, तर कुळधरण कारेगाव नवीन गट निर्माण झाला, तर जामखेड गट रद्द झाला आहे.

या नेत्यांना फटका
माजी सभापती कैलास वाकचौरे यांचा अकोले गट रद्द होऊन धामणगाव आवारी हा नवीन गट समाविष्ट झाला. राजेंद्र फाळके यांचा कर्जत, मंजूषा गुंड यांचा बारडेगाव सुद्रिक गट रद्द होऊन कुळधरण गटाचा त्यात समावेश झाला. कुळधरण हा गटही अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. माजी सभापती बाबासाहेब तांबे यांचा पारनेर गट रद्द होऊन नव्याने सुपा गटाचा समावेश झाला. माजी सभापती शाहूराव घुटे यांचा दहिगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. अॅड. सुभाष पाटील यांचा वांबोरी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, विद्यमान सभापती मीरा चकोर यांचा निमोण, पद््मा थोरात यांचा तळेगाव गट रद्द झाला. त्याऐवजी नव्याने संगमनेर खुर्द, वडगाव पान, समनापूर हे गट निर्माण झाले.
बातम्या आणखी आहेत...