आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या मनोमीलनाने कार्यकर्त्यांपुढे अडचणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - राजळे-घुले मनोमिलनानंतर प्रथमच होणा-या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नेत्यांचे मनोमिलन झाले असताना, आमचे काय, असा प्रश्न दोन्ही नेत्यांच्या इच्छुक उमेदवारांना पडला आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तालुक्याची राजकीय समिकरणे बदलत घुले-राजळे संघर्ष उभा राहिला होता. तेव्हा राजळेंपासून दुरावलेल्या अनेकांनी घुलेंच्या तंबूत जाणे पसंद केले. अनेकांनी प्रवेश करतानाच आपली जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी निश्चित केली. काळाच्या ओघात राजळे-घुले मनोमिलन झाले. आपली उमेदवारी गृहित धरत क ामाला लागलेले कार्यकर्ते मात्र, आता धास्तावले आहेत. या क ार्यकर्त्यांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच घुले व राजळे यांच्यासमोरही उभा राहिला आहे. राजळे यांचे होम ग्राउंड असलेल्या क ासार पिंपळगाव गट हा महिलांसाठी राखीव असून या गटातून घुले समर्थक बाळासाहेब ताठे आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. याच गटातून राजळे यांचे बंधू शिवशंकर राजळे हेही आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे घुले व राजळे यांच्यापुढे डोकेदुखी वाढली आहे. असाच प्रकार पंचायत समितीचे सभापती काका शिंदे हे आपल्या पत्नीसाठी कोरडगाव गणातून इच्छुक असून, ते राजळे समर्थक मानले जातात. याच गणातून घुले समर्थक दिगंबर गाडे यांनीही आपल्या पत्नीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
क ासार पिंपळगाव गणातून मुक्ताजी भगत पत्नीसाठी आग्रही आहेत. त्यांनी घुले-राजळे विभक्त असताना राजळे यांच्याविरोधात मेळावा घेतला होता. नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी या गणातून खरे उमेदवार आपणच असल्याने आपल्या पत्नीला या गटातून उमेदवारी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. याच गणातून राजळे समर्थक पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर हे आपल्या पत्नीसाठी अडून बसले आहेत. अशीच स्थिती माणिकदौंडी गणात असून पूर्वीचे राजळे समर्थक व आत्ताचे घुलेसमर्थक शिवाजी मोहिते हे पुन्हा आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. याच गणातून राजळे समर्थक मनीषा वायकर याही इच्छुक आहेत. एकंदरीत नेत्यांच्या मनोमिलनानंतर इच्छुकांची झालेली ही डोकेदुखी व बंडखोरी नेतेमंडळी कशी टाळतात यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.