आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालय प्रशासनाविरुद्ध १८ पासून आंदोलनाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना होणारा त्रास थांबायला तयार नाही. त्यामुळे १८ मेपासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्राहक मार्गदर्शन इतर संघटनांच्या वतीने आरोग्य उपसंचालकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले की, जिल्हाभरातून आलेल्या अपंग रुग्णांना जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा त्रास नेहमीचाच झाला आहे. वेळेवर उपचार मिळणे, तासनतास ताटकळवत थांबवणे, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती या समस्यांबाबत लेखी तोंडी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही. दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करावी, एकाच टेबलवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची व्यवस्था, बंद पडलेल्या यंत्रणा सुरू कराव्यात, सकाळ सायंकाळच्या ओपीडीला अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे नारायण पतंगे, बबलू खोसला, सुभाष शिंदे, केशव बरकते, रवींद्र जगताप, लक्ष्मी देशमुख, यास्मिन शेख, विजय नेटके, राजेंद्र साळवे, अनिल पवार, पावलस पवार, सुभाष आल्हाट, विजय पाथरे, आरती बडेकर, मनमोहनसिंग सुराणा, जालिंदर जरे, मारुती बाबाणे, नाना दोनते यांनी दिला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्याशी चर्चा करताना बबलू खोसला, सुभाष शिंदे इतर कार्यकर्ते.
छाया: उदय जोशी.
बातम्या आणखी आहेत...