आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या 67 शाळा अनधिकृत असून त्यात नगर तालुक्यातील 10 शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना मान्यताप्राप्त शाळेत पुढील वर्गात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे कळवले जाते. तथापि, कारवाई होत नसल्याने या शाळा सुरूच राहतात. अनधिकृत शाळांवर कारवाईचे अधिकार शिक्षणाधिकार्यांना आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांत कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने अनधिकृत शाळांची संख्या वाढतेच आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 61 शाळा, तर माध्यमिक विभागाने 6 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. त्यात नगर तालुक्यातील गणपतराव मते पाटील प्राथमिक शाळा (डोंगरगण), आदर्श विद्यामंदिर (नांदगाव), संत रोहिदास आर्शमशाळा (वडारवाडी), नोबेल पब्लिक स्कूल (अकोळनेर), मिसबाई तुकाराम गुंड पब्लिक स्कूल (पिंपळगाव माळवी), प्रयत्न पब्लिक स्कूल (सारोळा कासार), उषादेवी डोके प्राथमिक शाळा (बाराबाभळी) राजमाता जिजाबाई माध्यमिक (बाराबाभळी), तसेच साई विद्यालय (सावेडी) या शाळांचा समावेश आहे.
येत्या 1 एप्रिलपासून आरटीई कायदा लागू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत अनधिकृत शाळांना एक लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 25 हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.