आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेचा आणखी एक अधिकारी अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव येथील जि. प. शाळा दुरुस्ती गैरव्यहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी चंद्रकांत जगताप यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आदेश देऊनही गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

साडेआठ लाखांच्या अपहारप्रकरणी जिल्हा परिषदेने दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता पी. पी. खंडागळे यांच्यावरील आरोपपत्र शासनाला सादर करण्यात आले आहे. अपहार झालेल्या रकमेचा भरणा करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील यांना दिला होता.दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातील (उत्तर) उपकार्यकारी अभियंते चंद्रकांत जगताप यांची नेमणूक केली. गुन्हे दाखल करण्यासाठी 24 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आदेशाला केराची टोपली दाखवून अद्यापी गुन्हे दाखल केले गेले नाहीत.