आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेमी इंग्रजीमुळे जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांची थांबली गळती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषद शाळांची खासगी शाळांशी स्पर्धा सुरू आहे. विद्यार्थ्यांची गळती ही मुख्य समस्या होती. पण जि. प. शाळेत आता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केल्याने ही गळती थांबली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी शुक्रवारी केले.
शेंडी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी लंघे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती शाहूराव घुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती शिवाजी गाडे, कैलास वाकचौरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व परिसरातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लंघे म्हणाले, पूर्वी शिक्षक पुरस्कार देताना सदस्यांच्या शिफारशी विचारात घेतल्या जात. परंतु यावेळी गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शीपणे हे पुरस्कार देण्यात येत आहेत. राजळे यांच्याशी केंद्रप्रमुखांसंदर्भात चर्चा होऊन त्यानुसार तीन केंद्रप्रमुखांना पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने काम करणा-याचे मनोबल वाढते.
ग्रामीण भागातील जि. प. शाळांची खासगी शाळांशी स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी झाले. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसहभागातून सर्व शाळा संगणकीकृत झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे चांगले शिक्षण मिळण्यात शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे लंघे यांनी सांगितले. राजळे म्हणाल्या, शाळांमध्ये पिण्यासाठी पाणी, तसेच संरक्षक भिंतीचे प्रश्न सोडवण्यात येतील. लोकसहभागातून सर्व शाळांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ई-लर्निंग उपक्रमांतर्गत सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. गुणवत्तावाठीसाठी प्रशासन व शिक्षकांनी केलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यात यश आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कामात हलगर्जीपणा नको...
ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी गेल्यावर शाळा पहायला मिळते. शाळा जि. प. ची खरी प्रतिमा आहे. काम करताना प्रत्येकाला अडचणी येतात. आपल्या अडचणी आम्ही सोडवू, पण चांगले काम न केल्यास ते चालणार नाही. हलगर्जीपणा करणा-यांवर कारवाई केली जाईल, असे नवाल यांनी स्पष्ट केले.