आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा : आमदारकी सोडून जिल्हा परिषदेत जा - हर्षदा काकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - जिल्हा परिषदेमार्फत आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय आमदार चंद्रशेखर घुलेंनी घेऊ नये; अन्यथा त्यांनी आमदारकी सोडून जिल्हा परिषदेचेच प्रतिनिधीत्व करावे, असे आव्हान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांनी मंगळवारी दिले.

भाजप-शिवसेना महायुतीतर्फे भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसीलवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काकडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोट्यवधींंचा विकास निधी आणल्याचा दावा करणाºया आमदारांनी शहरटाकळी पाणी योजनेला निधी का नाही मिळवून दिला? आमदार घुले खोट्या घोषणा करतात. शेवगाव पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने शेवगावकरांना आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळते. एक दिवसही शुद्ध पाणी मिळत नाही, असा आरोप काकडे यांनी केला.

तालुक्यात झालेल्या गारपिटीत नुकसानीचे पंचनामे करताना वंचित शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, शहरटाकळी पाणी योजना त्वरित सुरू करावी, दुष्काळी अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे, रोहयोची कामे सुरू करावीत या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार रमेश काथवटे यांना मोर्चेकºयांतर्फे देण्यात आले. या वेळी महावितरणचे सहायक अभियंता सतीश शिंपी, पाणी योजनेचे शाखा अभियंता बबनराव खोले, कृषी अधिकारी अंबादास नाकाडे उपस्थित होते. मोर्चात भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ कुसळकर, भाजपचे अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा, अ‍ॅड. अविनाश मगरे, विष्णूपंत देहाडराय, रिपाइंचे विजय बोरुडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, बाळासाहेब सोनवणे, दिनेश लव्हाट आदी सहभागी झाले होते.

लांडेंनी घेतला काढता पाय
भाजपच्या वाटेवर असलेले एकेकाळचे घुले बंधूंचे कट्टर समर्थक दिलीप लांडे या मोर्चाच्या वेळी तहसील कार्यालय आवारातच होते. मात्र, मोर्चा तहसील आवारात येताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे उपस्थितांमध्ये लांडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत वेगवेगळया चर्चा सुरू झाल्या.

लकडेंविरोधात घोषणाबाजी
शहरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध धंदे त्वरित बंद करावे, अशी मागणी केली जात असताना मोर्चेकºयांनी पोलिस निरीक्षक लकडेंविरोधात घोषणा दिल्या. यामुळे संतप्त लकडेंनी ध्वनिक्षेपक हिसकवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.