आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा भाकप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा भाकप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर - तीन महिने उलटले तरी सरकारला अद्याप काॅ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी चाेख बंदाेबस्त लावून त्यांचा डाव हाणून पाडला. दरम्यान, भाजपच्या बैठकीसाठी शुक्रवारी फडणवीस शहरात दाखल झाले. त्यांचा ताफा विश्रामगृहाकडे जात असताना पोलिसांची नजर चुकवून काॅ. रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, दिलदार यांनी दुभाजकावरून उडी मारत थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमाेर आडवे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी त्यांना राेखले.
बातम्या आणखी आहेत...