आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजीत1 रुपयाला 10 लिटर पाणी ; आवाडे बॅँकेचा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शहरात काविळीचा फैलाव सुरू असतानाच नागरिकांना अत्यल्प किंमतीत शुद्ध पाणी देण्याची योजना इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेने सुरू केली आहे. बॅँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व आवाडे यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ प्रकाश आवाडे, यांच्या उपस्थितीत झाला.
बॅँकेने 10 लाख रुपये खचरून हा प्रकल्प उभारला असून 1 रुपयांचे नाणे टाकले की 10 लिटर शुद्ध पाणी यातून मिळणार आहे. अशा पद्धतीचे आणखी चार प्रकल्प शहरात सुरू करणार असल्याचे या वेळी प्रकाश आवाडे यांनी सांगितले.