आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Percent Amount Diposited On Mother Father Account

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पगारातील 10 टक्के रक्कम आई-वडिलांच्या नावावर, कोल्हापूरातील पतसंस्थेचा आदर्श उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ज्यांनी आपले पालनपोषण करून आपल्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले, त्या आई- वडिलांनाच उतरत्या वयात छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये, या उदात्त हेतूने कोल्हापुरातील वसंतराव चौगुले पतसंस्थेतील 150 कर्मचा-यांनी आपल्या पगारातील 10 टक्के रक्कम दरमहा आई-वडिलांच्या संयुक्त खात्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पतसंस्थेच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात
बारा शाखा आहेत.


यातील बहुतांश रक्कम ही घरातच खर्च होणार असली तरीही दर महिन्याला आपल्या नावावर काही ना काही रक्कम जमा होणार आहे, याची खात्री आता या ज्येष्ठ नागरिकांना झाली आहे. त्यामुळे आपल्याला घरात किंमत असल्याचेही वातावरण तयार होणार आहे. घरामध्ये संवादाचे वातावरण तयार होण्यास हा उपक्रम नक्कीच साहाय्यभूत ठरणार आहे.


संस्थेकडून प्रस्ताव
नेहमीच कर्मचारी आणि सभासदांसाठी वेगळे उपक्रम राबवणा-या आमच्या वसंतराव चौगुले पतसंस्थेने अशा पद्धतीचा प्रस्ताव कर्मचा-यांसमोर मांडला. सगळेच कर्मचारी आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात, असे नव्हे; परंतु सर्वांमध्ये आर्थिक सक्षमतेची भावना निर्माण व्हावी व या माध्यमातूनही नात्यांमधील असलेली आपुलकी वाढावी या हेतूने मांडलेल्या या प्रस्तावाला कर्मचा-यांनी लगेचच प्रतिसाद दिल्याने आम्हाला समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली.