आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात मारहाण करून व्यापार्‍याचे 12 लाख रुपये लुटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- येथून जवळच असलेल्या हातकणंगले तालुक्यातील नागाव फाट्याजवळ रविवारी भरदुपारी एका व्यापार्‍याचे 12 लाख रुपये लुटण्यात आले. याप्रकरणी कोल्हापूरच्या युवकांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून रात्री उशिरापर्र्यत याबाबत कारवाई सुरू होती. निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पत्रे व्यापारी पांडूरंग विलास वळके हे शिरोली एमआयडीसीमध्ये पत्रे व अन्य बांधकाम साहित्य खरेदीसाठी गाडीवरून जात होते. याचवेळी दुसर्‍या गाडीवरून आलेल्या काही युवकांनी त्यांना अडवून मारहाण केली व त्यांच्याकडील पैसे व त्यांचीच गाडी घेऊन पलायन केले. या ठिकाणी एक मोबाईल काही युवकांना सापडला. त्यावरील कॉल रेकॉर्ड पाहून या युवकांनी काही संश्यितांना पकडले. पोलिसांनी कोल्हापुरातील माजी नगरसेवक रहिमान हकीम यांना पोलिस ठाण्यात आणले होते. त्यांच्या इम्रान नामक मुलाने हे कृत्य केल्याचा संशय आहे.