आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Persons Get Life Imprisment For Hockey Player Murder

हॉकीपटू बंधूंच्या हत्यातील 12 आरोपींना जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - राष्ट्रीय हॉकीपटू उमेश व महेश जाधव या बंधूंच्या खूनप्रकरणी इस्लामपूरचा माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नेता जयवंत पाटील याच्यासह बारा जणांना आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. ना. सरदेसाई यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


जयवंत पाटील आणि जाधव बंधू यांचा घराच्या जागेतून वाद होता. यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. 6 सप्टेंबर 2007 ला इस्लामपूर शहरातील गांधी चौकात भरदिवसा जाधव बंधूंच्या शिलाई दुकानात घुसून जयवंत पाटील याने 12 साथीदारांच्या मदतीने या दोघांचा खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी जयवंत पाटील याच्यासह त्याचे साथीदार भाऊ माणिक पाटील, गणेश पाटील, धनाजी पाटील, सचिन पाटील, उदय पवार, उत्तम पाटील, देवेंद्र पाटील, सचिन ढोकळे, सुधाकर माने, इंद्रजित पाटील, संतोष कणसे, सुनील ढोकळे यांना अटक केली होती. त्यांच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला.


दोन बालगुन्हेगार
सोमवारी न्यायालयाने 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सुनील ढोकळे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील दोन बालगुन्हेगारांवर बाल न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे. आरोपी राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने या निकालाकडे सा-या जिल्ह्याचे लक्ष लागून होते.त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.