आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Standard Girl Student Suicide At Kolhapur. Crime News In Marathi

शाळेत मैत्रिणी टोमणे मारत असल्याने 12 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- बारावीत शिकत असलेल्या स्मिता उत्तम खांडेकर (१९, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) या युवतीने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मैत्रिणी टोमणे मारत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले असल्याची चर्चा घटनास्थळी होती. नागाळा पार्क परिसरातील वारणा काॅलनीमध्ये स्मिता काही मैत्रिणींसह भाड्याने राहत होती. तिच्या दोन मैत्रिणी परीक्षेच्या अभ्यासासाठी गावी गेल्या होत्या. साेमवारी सकाळी तिने दार न उघडल्याने संशय वाढला. पाेलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता तिने गळफास लावून घेतल्याचे स्पष्ट झाले. स्मिताला दहावी व अकरावीत ९० टक्के गुण हाेते. तिचे वडील शेतकरी अाहेत.