आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी जखमी, 1 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- पुणे-बंगळुरु राष्‍ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ नागपूरहून सहलीसाठी आलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या बसचा अपघात झाला आहे. यामध्‍ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्‍याला पुण्‍यात हलवण्‍यात आले आहे.

 

बुधवारी मध्‍यरात्री साडेअकराच्‍या सुमारास हा अपघात झाल्‍याची माहिती आहे. खांबाटकी बोगदा पार करुन पुढे जाणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या बसला मागून येणा-या दुधाच्‍या टँकरने धडक दिली. त्‍यामुळे बसची धडक पुढे असलेल्‍या ट्रकला बसली. नंतर तो ट्रक पुढे रांगेत असलेल्‍या दुस-या ट्रकला धडकला. या 4 वाहनांच्‍या अपघातात विद्यार्थ्‍यांसह बस आणि टँकरचालकही जखमी झाले आहेत. 


कार्तिक किशोर ठाकरे (१५),  आनिक्षा विजय घायवाट ( २०),  संगिता गजानन पारतवार (६०), कमलाबाई तोलाराम सुतोणी  (६५, र. पारतवार), अग्नी अनिल राऊत ( २०), देवेंद्र रमेश चौधरी ( २१),  मयुरी काशीनाथ लोनगाडगे (२०), प्रणय अरुण शिवणकर (१५), हर्षल लीलाधर बांते (१५), रागीनी विनोद देवडे ( २०), सतिश सुभाष शेटे (३२, नवे पारगांव, हातकणंगले कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. भाविक अशोक बांते (वय १५, रा. ओम नगर सकरदरा नागपूर) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. बस क्लिनर चुन्नाराम सलामी (२८,  मध्यप्रदेश) आणि बसचालक बाळकृष्ण रामनरेश विश्वकर्मा (४९) हे देखील जखमी झाले आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, खंडाल्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक स्‍मिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मोहन कदम, शिरवळचे सहायक पोलिस निरीक्षक सुनिल पवार घटनास्‍थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्‍यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...