आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. वीरेंद्र तावडेच्या संपर्कातील 13 जणांची कसून चौकशी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- सनातनचा साधक डा. वीरेंद्र तावडे हा कोल्हापुरात वास्तव्यास असताना १३ जणांशी त्याचा जवळचा संबंध होता त्या सर्वांचीच कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्सही तपासण्यात येत आहेत. कोल्हापूरमध्ये गंगावेश परिसरात तावडे वास्तव्यास होता. या कालावधीत शहरातील अनेकांच्या घरी त्याचे येणे जाणे होते. विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी त्याची हजेरी असे. अशा जवळपास १३ जणांची पोलिसांनी यादी तयार केली असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून येथील सराफ संजय साडविलकर यांचे नाव पुढे आले आहे. मुंबईत सनातनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत साडविलकर यांचा उल्लेख करून त्यांच्यावर आरोपही करण्यात आले. दरम्यान साडविलकर यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...