Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» 2 Killed In Bike Accident In Kolhapur

कोल्हापुरात सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसून 2 सख्ख्या भावांचा जागेवरच मृत्यू

रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसून कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Sep 20, 2017, 15:48 PM IST

कोल्हापूर- कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील कसबा बावडा रोडवरील खानविलकर पेट्रोल पंपासमोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अर्धवट सोडलेल्या कामातील रस्त्याकडेला पडलेल्या मोठ्या सिमेंटपाईपमध्ये भरधाव दुचाकी घुसल्याने दुचाकीवर स्वार असलेल्या दोघ्या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना काल (रविवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

तेजस महादेव घाटगे (वय 32), योगेश महादेव घाटगे (वय 28, दोघेही रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल) अशी मयत झालेल्या दुर्दैवी भावांची नावे आहेत. या घटनेने पिंपळगाव खुर्द गावच्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत होती.

अपघातात ठार झालेल्या दोन भावांपैकी तेजस हा गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसीमध्ये नोकरीला होता. तर योगेश हा बांधकामावर सेंट्रींगचे काम करायचा. योगेश आज कोल्हापूरात सेंट्रींगचे मिळणारे काम पाहण्यासाठी आला होता. त्यालागावाकडे घेवून जाण्यासाठी तेजस दुचाकी घेवून आला होता. हे दोघे भाऊ त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत असताना खानविलकर पेट्रोलपंपाशेजारील असणा-या मोठ्या सिमेंट पाईपमध्ये त्यांची दुचाकी शिरली. गाडीच्या भरघाव वेगाने ते दोघेही पाईपमध्ये दुचाकीसह फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने बराच वेळा वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताचे फोटो...

Next Article

Recommended