आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात ट्रक उलटून 22 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - बागलकोट-बेळगाव रस्त्यावर हालकी क्रॉसिंगजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातात 22 मजूर ठार झाले. हे सर्व यादगिरी जिल्ह्यातील सुरपूरचे रहिवासी होते. 32 जण जखमी आहेत. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृतांत 4 पुरुष, 8 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे. पावसाळ्यातील शेतीची कामे संपल्यानंतर लमाण तांड्यातील हे लोक धान्याची 60 पोती घेऊन मजुरीसाठी कोकणाकडे निघाले होते. याच पोत्यांखाली ते दबले.
चालकाची डुलकी ठरली मजुरांचा काळ : ट्रकचा मालकच ट्रक चालवत होता. तो पेंगत असल्याचे पाहून दुस-याने ‘तू झोप, मी ट्रक चालवतो’ असे सांगितले. मात्र, नवीन ट्रक हाती देण्यास नकार देत मालक ट्रक चालवत राहिला. अखेर झोप अनावर झाली आणि
ट्रक उलटला.