आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सज्जनगड’च्या पायथ्याशी हनुमानाची 25 फुटी भव्य मूर्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर हनुमानाचे मंदिर पाहायला मिळते. हनुमान ही शक्तीची देवता आहे. समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या थीम पार्कमुळे नवीन पिढीला सर्मथांचे प्रेरणादायी चरित्र समजेल. संतांचे जीवन व कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच पर्यटनासाठीही सर्मथ दर्शन प्रकल्प आदर्श ठरेल,’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
सज्जनगडाच्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेल्या सर्मथ दर्शन थीम पार्कमधील 25 फुटी भव्य हनुमान मूर्तीचा लोकार्पण सोहळा शनिवारी झाला त्या वेळी पुरंदरे बोलत होते. ‘एमटीडीसी’चे कार्यकारी संचालक डॉ. जगदीश पाटील, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका माया पाटील, चित्रपट निर्माते अरुण गोडबोले, अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय लेखिका वीणा प्रभू, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे आदी उपस्थित होते. पुरंदरे यांच्या हस्ते लेखक श्याम साखरे यांनी लिहिलेल्या ‘समर्थ स्थापिक अकरा मारुती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.