आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरजेत लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा हद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला यूवक. - Divya Marathi
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला यूवक.
कोल्हापूर/सांगली- मिरज येथे लग्नाच्या अक्षतांना 3 तास असतानाच 27 वर्षीय नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र मदन पिसे (रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील लोकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.
 
मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील एका मुलीशी ठरविण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ पार पाडला. शनिवारी मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. सकाळी वऱ्हाडासह सर्व नातलग मंगल कार्यालयामध्ये दाखल झाले होते. 
 
रवींद्रही घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला 9 च्या सुमारास मृत घोषित केले. दुसरीकडे मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. तिथे हे वृत्त कळताच सर्वांना धक्का बसला. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...