आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली जिल्ह्यात ३५ लाखांच्या बनावट नोटा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - मिरज येथे पोलिसांनी छापा टाकून ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा शुक्रवारी सायंकाळी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या कारखान्यावरही छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे.

सांगली व काेल्हापूर जिल्ह्यात बनावट नाेटा चलनात अाणणारे एखादे रॅकेटच चालवले जात असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. तसेच या प्रकरणाचे कर्नाटकातही धागेदोरे असल्याने पोलिसांचे एक पथक कर्नाटकात तपासासाठी रवाना झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...