आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापुरात ३५ लाखांची मॅगी जप्त, अहवाल येईपर्यंत विक्रीस बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथील परदेशी अँड सन्स यांच्या गोदामातील ३५ लाख रुपयांचे मॅगीचे पुडे अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी छापा टाकून जप्त केले अाहेत. या २० टन मॅगी पुड्यांपैकी १६ नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर सांगलीतही ९० हजार रुपयांचा ५०० किलाे मॅगीचा साठा जप्त करण्यात अाला अाहे.

बुधवारी कोल्हापुरात अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. अाराेग्याला घातक असलेले हे पदार्थ नष्ट करण्याची मागणीही करण्यात अाली. तर गुरुवारी विभागाच्या पथकाने गोकुळ-शिरगाव औद्योगीक वसाहतीतील परदेशी अँड सन्स या विक्रेत्याच्या गोदामावर छापा टाकला. तेथे २० टन मॅगीचे पुडे आढळून आले. या पुड्यांची विक्री न करण्याचे अादेश बजावण्यात अाले अाहेत. शहरातील चार बझार आणि काही दुकानांतूनही मॅगीच्या पुड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी पाठवलेल्या नुमन्यांचा अहवाल येईपर्यंत लोकांनी मॅगीचे पुडे खरेदी करू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.