आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याने पत्नी, दोन मुलींसह 60 वर्षांच्या आईची केली निर्घृण हत्या, दोन मुले बचावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - एकाच कुटुंबातील चार महिलांचा खून झाल्याची खळबळजनक घटना जत तालुक्यात घडली आहे. भरत इरकर या व्यक्तीने पत्नी, दोन मुलींसह आईचा खून केला. या घटनेने कुडनूरसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. आज (शनिवार) सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. हे खून जमीनीच्या वादातून झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पतीनेच पत्नीसह आई व मुलींचा खून केल्याची कबुली दिली.
- शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे.
- डफळापूर जवळील कुडनुर येथील ही घटना असून पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
- घरातील 16 ते 60 वर्षांच्या चार महिलांचा निर्घृण खून केल्यानंतर आरोपी भरत इरकरने पोलिसांसमोर स्वतः खून केल्याचे कबुल केले.
मृत महिलांची नावे आणि आरोपीसोबतचे नाते
सुशीला कुंडलिक इरकर (वय-60),आई
सिंधुबाई भारत इरकर (वय-40), पत्नी
रुपाली भारत इरकर, (वय-19) मुलगी
राणी भारत इरकर, (वय-16) मुलगी

दोन मुले बचावली
भारत इरकर याला बाळाप्पा आणि आकाश ही आणखी दोन मुले आहेत. दोन्ही मुले शुक्रवारी कुडनूर गावात आत्याच्या घरी अभ्यासाला गेली आणि तिथेच झोपले होते. कदाचित ते घरात असते तर भारतकडून त्यांचीही हत्या झाली असती. बाळाप्पा आठवीला, तर आकाश सहावीला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...