आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापूरच्या धबधब्यात पाच युवक वाहून गेले; चाैघांना वाचवण्यात यश, एक युवक बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
कोल्हापूर- शाहूवाडी तालुक्यातील उखळू या गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या म्हातारकडा हा धबधबा पाहण्यासाठी मंगळवारी आलेल्या सहा युवकांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून जात हाेता, त्याला वाचवण्यासाठी गेलेले अन्य चौघेही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. मात्र, ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केल्याने चाैघांना वाचवण्यात यश अाले. मात्र, अद्याप एक युवक बेपत्ता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने शाहूवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) येथील मेहबूब बाबासाहेब फकीर, खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी आणि अमोल अशोक माळी हे युवक मंगळवारी सहलीसाठी म्हातारकडा धबधब्यावर गेले हाेते. त्यापैकी खुदबुद्दीन फकीर हा धबधब्याच्या प्रवाहात उतरला, मात्र पाण्याचा जोर जास्त असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. तेथील झुडपांना पकडून बाहेर येण्याचा त्याने प्रयत्न केला; परंतु प्रवाह जास्त असल्याने शक्य झाले नाही. त्याला वाचवण्यासाठी अन्य मित्र पाण्यात उतरले. मात्र, खुदबुद्दीनसह अन्य चौघे जण वाहून गेले. काठावर असलेल्या मित्राने 
तत्काळ धावत जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली.  

पाचपैकी चार जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले, मात्र खुदबुद्दीनचा अद्याप शोध लागलेला नाही. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने जखमी झालेल्या युवकांना कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ते सर्व जण धोक्याच्या बाहेर आहेत. घटनास्थळी अंधार झाल्याने तसेच जंगली प्राण्यांचा वावर असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पुन्हा वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात अाली