आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षीय वरदला दि लाँगेस्ट सायकलिंग मॅराथॉन पुरस्कार, इंडिया बुकसह 3 विक्रमांत नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एशिया, इंडिया आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डस या तिन्ही विक्रमांमध्ये वरदच्या नावाची नोंद झाली आहे. - Divya Marathi
एशिया, इंडिया आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डस या तिन्ही विक्रमांमध्ये वरदच्या नावाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर - अवघ्या सहा वर्षांचा चिमुरडा वरद वैभव चंदगडकर या सायकलपटूने बेळगाव ते कोल्हापूर १२८ किलोमीटरचे अंतर केवळ ६ तास ३० मिनिटे आणि ३४ सेकंदात पूर्ण करून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. एशिया, इंडिया आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डस या तिन्ही विक्रमांमध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे. त्याला मंगळवारी दि लाँगेस्ट सायकलिंग मॅराथॉन पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
 
वडिलांनी दिले प्रशिक्षण
त्याचे पाय टणक व्हावेत म्हणून त्याचे वडील त्याला दररोज १० ते १५ किलोमीटर सायकल चालवायला घेवून जात. हळूहळू ३० ते ३५ किलोमीटर सायकल चालवून वरद न दमता जावू लागल्याने त्याचा वडिलांनी त्याला उत्कृष्ठ सायकलपटू बनवण्याचा निर्णय घेतला. आई आरतीच्या संस्कारात वाढणारा वरद दररोज सराव करत होता. 
 
स्केटिंगमध्येही विक्रमवीर
वरदने यापूर्वी सुद्धा स्केटिंग मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव कोरून ठेवले आहे. सायकलपटू म्हणून आपले नाव विक्रमाच्या यादीत नोंदले जाण्यासाठीचे प्रयत्न त्याचे प्रयत्न होते. त्यासाठी वडिलांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी बेळगाव ते कोल्हापूर असे १२८ किलोमीटर चे अंतर वरद ने सायकलवरून पार करावे अशी इच्छा व्यक्त केली. महेश कदम यांच्या सहकार्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या ऑब्जर्वरना भेटून वरदच्या विक्रमाची तयारी सुरु झाली.

अशी केली विक्रमात नोंद
१ मे रोजी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी बेळगाव मिलटरी जवळील माधव मंदिरापासून वरदने सायकलिंगला पंचासमक्ष सुरुवात केली. नियमानुसार त्याला हा १२८ किलोमीटरचा प्रवास ९ तासांत पूर्ण करावयाचा होता. या प्रवासा दरम्यान त्याला ४ वेळा थांबून विश्रांती घेण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र वरद केवळ एकदाच थांबला आणि पुन्हा त्याने हा प्रवास सुरु केला. सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी तो भवानी मंडपात पोहचला. त्याने हा विक्रम करताच त्याच्या नातेवाईकांसह उपस्थितांनी जल्लोष करून वरद ला उचलून कौतुकाने खांद्यावर घेतले.
 
वरदला त्याच्या या सायकलिंग मधील विक्रमामुळे दि लॉंगेस्ट सायकलिंग मॅराथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याच्या उपक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकोर्डस चे परीक्षक बिश्वजीत रॉय चौधरी,चेन्नई च्या युनिक बुक ऑफ रेकॉर्ड्स चे रहमान आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे महेश कदम यांच्या हस्ते पदक देवून त्याचा सत्कार करण्यात आला. आता वरद ने सायकलिंग मध्ये टूर दि फ्रांस या महत्वाकांक्षी आणि बलाढ्य स्पर्धेत सहभाग नोंदवून भारतासाठी पदक प्राप्त करावे अशी इच्छा त्याच्या आई आरती आणि वडील वैभव यांनी व्यक्त केली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...