आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जासाठी ६०० कोटी - चंद्रकांत पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी सरकार ६०० कोटी रुपये देणार आहे. शेतमालाला भाव मिळण्यासाठी गोदामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्यात ४७ कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केले आहे. तीन कारखाने बाकी आहेत. मात्र, राज्यातील १७६ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. साखर निर्यातीसाठी केंद्राच्या ४ हजार रुपये प्रतिटन अनुदानाखेरीज राज्य प्रतिटन एक हजार रुपये अधिक अनुदान देणार आहे. सुमारे वीस लाख टन साखर निर्यात होईल, असे पाटील म्हणाले.