आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची महाज्योत तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - नाशिक येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीने ७५० फुट लांबीच्या महाज्योतीची निर्मीती केली आहे. १०८ दिवस ही ज्योत प्रज्वलित ठेवण्यात येणार असून या महाज्योतीची गिनीज बुकमध्ये नोंद होणार असल्याची माहिती सुतगिरणीचे अध्यक्ष डाॅ. अशोकराव माने यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी मुंबई येथील श्री जयगोपाल गायत्री सिध्दपीठ व पुणे येथील मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठान यांच्यावतीने नाशिकच्या तपोवनात काश्मिर ते कन्याकुमारी एवढे म्हणजेच ३६१७ किलोमीटरच्या धाग्यापासून महाज्योत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुतगिरणीच्या कर्मचा-यांनी दोन महिन्यांत ही महाज्योत तयार केली. १४ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे.
महाज्योतीची वैशिष्ट्ये
>काश्मीर ते कन्याकुमारी या ३६१७ किलोमीटरच्या धाग्याचा वापर
>ज्योतीची लांबी ७५० फूट
>जाडी इंच
>वजन २० किलो
>२४ बाय २४ फुटांच्या दिव्यात वापर
>टँकरने तिळाचे तेल पुरवठा
>तासाला लिटर तेल लागणार
>सलग १०८ दिवस ठेवणार प्रज्वलित.
छायाचित्र: दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने तयार केलेल्या ७५० फूट लांबीच्या महाज्योतीची पाहणी करताना अध्यक्ष अशोकराव माने, अनिल काबंळे, वैभव पाटील, सागर माने आदी.