आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस दरावरून भडकलेल्या आंदोलनात 9 लाख रुपयांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ऊस दरावरून भडकलेल्या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तोडफोडीमध्ये 9 लाख रुपयांचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात विविध संघटनांच्या 105 आरोपींपैकी 58 जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या आठवड्याभराच्या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्टरचे टायर फोडणे, दुधाचा टँकर अडवून दूध ओतणे, 14 एस. टी ची तोडफोड, शाहू साखर कारखान्याची दोन व वारणा साखर कारखान्याचे एक शेती कार्यालय फोडणे यासारखे एकूण 25 गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. याप्रकरणी 105 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 58 जणांना अटक करण्यात आली आहे.
याआधीच्या आंदोलनावेळी राज्यभरात झालेल्या सव्वा दोन कोटी रूपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली गेली असताना आता त्यात आणखी 9 लाख रूपयांची भर पडली आहे. त्यांच्याकडून ही वसुली करण्यात येईल असेही सांगण्यात आले.