Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | video Sharad Pawar on Maratha Morcha dias

Video:पवारांनी तरुणांना समजावले-शांततेत आंदोलन करा, अन्यथा पूर्ण चळवळ संकटात येईल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 01:12 PM IST

ज्यांचा विचार घेऊन आपण समाजासमोर जात आहोत, त्यांनी कधीही आपल्याला हा मार्ग दाखवलेला नाही, असे पवार म्हणाले.

 • कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज कोल्हापुरातील मराठा आरक्षणाच्या मंचावर उपस्थिती लावली. आरक्षणासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असल्याचे सांगतानाच पवारांनी कार्यकर्त्यांना संयमाचा मोलाचा सल्ला दिला. तसेच आम्हाला कोणाच्या ताटातील घास नको, आमचे तेवढे मात्र आमच्या ताटात टाका, असा शब्दांत पवारांनी त्यांची भूमिका मांडली.


  काय म्हणाले शरद पवार...
  >> आपण 58 मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. पण कुठे काहीही गैरप्रकार घडला नाही याबाबत सर्वांचे कौतुक.
  >> आपण आरक्षण मिळेपर्यंत आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करतच राहणार आहोत, पण आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे.
  >> सांगतील शाळेच्या बसला आग लागल्याची एक अप्रिय घटना घडली, सुदैवाने त्यात काही घडले नाही. पण त्यात विद्यार्थ्यांना काही झाले असते तर आपली ही न्यायाची चळवळ संकटात आली असती. त्यामुळे महिला, लहान मुले असतील अशा ठिकाणी चळवळीला काय स्वरुप द्यायचे याची काळजी घ्यावी.
  >> ज्यांचा विचार घेऊन आपण समाजासमोर जात आहोत, त्यांनी कधीही आपल्याला हा मार्ग दाखवलेला नाही.
  >> मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यादृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला कुणाचेही काहू काढून घ्यायचे नाही. दुसऱ्याच्या ताटातील अन्नाचा घास आम्हाला नको, पण न्यायाचे तेवढे पदरामध्ये टाका.
  >> आपल्यामध्ये एकजूट ठेवा. कोणी आंदोलनाला गालबोट लावत असेल अशी शंका आली तर त्याला खड्यासारखे बाजुला करा.

 • video Sharad Pawar on Maratha Morcha dias
 • video Sharad Pawar on Maratha Morcha dias

Trending