आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: 3 सत्तारूढ आमदारांना कल्पना होती; बिद्रेंच्या पतीचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विनी बिंद्रे. - Divya Marathi
अश्विनी बिंद्रे.

कोल्हापूर- अश्विनी बिद्रे यांच्या खूनाची सत्तारूढ तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरूंदकर याच्या फ्लॅटवर येऊन गेले होते असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

राजकीय दबाव असल्याचाही आरोप

गुरूवारी दुपारी गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार व बंधू आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मोठा राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला आहे. राजू गोरे म्हणाले, 11 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत. याच दिवशी संध्याकाळी राजेश पाटील आणि सत्तारूढ तीन आमदार अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेथे अभय कुरूंदकर याचा फोन आला. यानंतर हे चौघेही कुरूंदकर याच्या फ्लॅटवर गेले. तेथे बराच वेळ हे सर्वजण होते. त्यामुळेच त्यांना या खूनाची संपूर्ण कल्पना होती.

 

 

खडसे यांचा भाचा अडकल्याने...

खडसे यांचा भाचाच यामध्ये अडकल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत राजकीय दबाव आहे, असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे बंधू आनंद बिद्रे यांनी केला. हा गुन्हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा व अ‍ॅड. उज्वल निकम यांची या केसमध्ये नियुक्ती करावी. अभय याचा भाऊ संजय कुरूंदकर पुण्यात पोलिस दलात आहे. त्याची बदली गडचिरोलीला करावी. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांना सहआरोपी करा, अशा मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. 

 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...