आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- येथील न्यू शाहूपुरी मधील रमेश जयसिंग बनछोडे यांच्या 204 पाटणकर कॉलनीतील राहत्या दुमजली घराला आग लागून 15 लाखाचे प्रापंचिक साहित्य आगीत जळून खाक झाले तर एका म्हैशीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला .सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने 20 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शाहूपुरी येथील पाटणकर कॉलनी मध्ये राहणाऱ्या रमेश बनछोडे यांच्या राहत्या घराला भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले.आणि बनछोडे यांचे राहते घर त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या डोळ्यासमोर जळून खाक झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे एकूण 5 बंब घटनास्थळी दाखल झाले.एकूण 20 जवान आणि अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आगीत टीव्ही, फ्रीज, कपडे, फर्निचर आणि अन्य प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.