आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाक बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, दाहा जण जखमी; शिरोली येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शिरोली येथील हौसिंग सोसायटी मधील बंगल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवारी) सकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये दऱ्याप्पा काडगोंड, सुधाराणी काडगोंड, श्रावणी काडगोंड, दानाम्मा पाटील,कृष्णा केदारी पाटील, महेंद्र कृष्णा पाटील, सागर जनार्दन पाटील, निलेश सुखदेव पाटील, निलेश सहदेव आढाव, मारूती सुतार यांचा समावेश आहे. 


अधिक माहिती अशी की, शिरोली माळवाडी भागात एक हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत कृष्णा केदारी पाटील यांचा दोन मजली इमारतीतील पहिला मजला दऱ्याप्पा काडगोंड यांच्या कुटुंबियांना किरायाने दिला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दऱ्याप्पा यांची पत्नी सुधाराणी स्वयंपाकाची तयारी करत होत्या. तेवढ्यात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला भीषण आग लागली. स्फोटात दऱ्याप्पा काडगोंड, सुधाराणी, श्रावणी काडगोंड, दानाम्मा पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले. 


घराला आग लागली म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले घरमालक कृष्णा केदारी पाटील व त्यांचा मुलगा महेंद्र हे दोघेजण खाली येऊन भाडेकरूंना बाहेर काढू लागले. ते देखील या आगीत होरपळे. बंगल्याला आग लागली म्हणून शेजारी असलेला सागर पाटील आग विझवण्यासाठी धावत आला. आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात तो देखील जखमी झाला. तसेच, आगीत अडकेलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारे निलेश पाटील, निलेश आढाव, मारूती सुतार हे देखील जखणी झाले. या आगीत एकूण दहा जण गंभीर जखमी झाले असून आठ जणांनावर सीपीआरमध्ये, तर दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...