आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करुन मिळेल! सांगलीच्या तरुणाची भन्नाट आयडिया, ग्राहकांची लागली रांग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगलीच्या रामचंद काशिद यांनी तयार करुन घेतला सोन्याचा वस्तरा. - Divya Marathi
सांगलीच्या रामचंद काशिद यांनी तयार करुन घेतला सोन्याचा वस्तरा.

सांगली - दाढी करुन चकाचक राहाणे ही अनेक पुरुषांची हौस असते. जर कोणी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करुन देणार असेल तर... होय सोन्याचा वस्तरा! सांगलीच्या चिंचोळ्या गल्लीत असलेल्या वस्तरा मेन्स स्टुडिओचे मालक रामचंद काशिद हे ग्राहकांची दाढी करण्यासाठी सोन्याचा वस्तरा वापरत आहेत. आपला व्यवसाय अधिक वाढावा यासाठी त्यांनी आपला व्यवसाय ज्या हत्यारावर चालतो, तो वस्तरा सोन्याचा करुन घेतला आहे. त्यांनी लढवलेली ही शक्कल त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठीही फायद्याची ठरली आहे. सोन्याचा वस्तऱ्याने दाढी करुन घेण्यासाठी त्यांच्याकडे आता रांग लागत आहे. 

 

साडे दहा तोळ्याचा सोन्या वस्तरा  
- वस्तरा मेन्स स्टुडिओचे मालक रामचंद काशिद यांचे आपल्या व्यवसायवर आणि आई-वडिलांवर असलेले प्रमे त्यांच्या कामातून दिसून येते. 
- आई-वडिलांच्या लग्नाच्या 33व्या वाढदिवशी रामचंद यांनी सोन्याचा वस्तऱ्याने दाढी करण्यास सुरुवात केली. सोन्याच्या वस्तऱ्याचा पहिला अनुभव साहाजिकच त्यांनी आपल्या वडिलांना- दत्तात्रय काशिद यांना दिला. 
- सोन्याचा वस्तरा बनवून घेण्याची कल्पना जेव्हा रामचंद यांना सुचली तेव्हा त्यांनी अनेक सराफांकडे त्याबद्दल विचारणा केली. परंतू सांगलीतील बहुतेक सराफांकडून त्यांना नकारच मिळाला.  अपवाद ठरले ते सांगलीचे चंदूकाका सराफ येथील मॅनजेर महावीर पाटील. त्यांनी सोन्याचा वस्तरा बनवण्याचे आव्हान स्वीकराले. पुण्यातील कारागिर मिथून राणाच्या मदतीने त्यांनी 20 दिवसांत साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्तरा तयार केला. 
- सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करणे खिशाला कात्री लावणारे असले तरी नवीन अनुभवासाठी असे करायला काही हरकत नाही. 

 

'सोन्याचा वस्तरा नाही तोपर्यंत दाढी नाही'

- रामचंद सुरुवातीला दुसऱ्याच्या सॅलोनमध्ये कारागिरी करत होते. परंतू स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची जिद्द त्यांच्यात होती. 

- वडील दत्तात्रय काशिद यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचे मेन्स सॅलोन सुरु केले. व्यवसायात जम बसला. परंतू नवे काही करण्याची उर्मी शांत बसू देत नव्हती. त्यातच आपला व्यवसाय ज्या शस्त्रावर अवलंबून आहे तो वस्तरा सोन्याचे करण्याचा निश्चय त्यांनी केला, आणि एक प्रणच केला, जोपर्यंत सोन्याचा वस्तरा हातात येत नाही तोपर्यंत स्वतःची दाढी-कटिंग करायची नाही. 

- अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर रामचंद यांचे स्वप्न साकार झाले. सोन्याचा वस्तरा तयार करण्यासाठीचे पुरेसे पैसे जमा झाले आणि वस्तरा तयार करुन देणारा सराफही भेटला. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी... 

बातम्या आणखी आहेत...